Birthday Quotes for Daughter in Marathi
बाबाची लाडकी परी,
नशिबाने बस एवढे उपकार करावेत
तुझे सर्व स्वप्न पूर्ण करावेत
देवाकडे काही मागणे नाही माझे बस
जे तुला हवे आहे ते नेहमी तुझ्यासोबत असावे..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मुली..!
तुझ्या ईच्छा आकांक्षा उंच भरारी घेऊदे
मनात आमच्या एकच ईच्छा
तुला उदंड आयुष्य लाभुदे..
लाडक्या परीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
आजचा दिवस खास आहे,
आज जगातली सर्वात अनमोल भेट आम्हाला मिळाली,
चिमुकल्या पाउलांनी छोटीसी परी आमच्या घरी आली,
आणि आमचं सगळं आयुष्यच बदलून गेली..
Happy birthday to my princess..!
तू आमच्या जीवनातील एक सुंदर परी आहेस,
मम्मी पप्पांची छोटीसी बाहुलीआहेस.
तूच आमच विश्व आणि तूच आमचा प्राण आहेस.
लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
यशस्वी हो, औक्षवंत हो,
अनेक आशीर्वादांसह –
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!
माझ्या जिवलग मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
तू माझ्यासाठी अनमोल आहेस.
माझी प्रार्थना आहे की तुझा वाढदिवस
वैभव आणि प्रेमाने परिपूर्ण असावा..
बोलक्या तुझ्या स्वभावाने थकवा माझा पळून जातो
तुला पाहताच क्षणी मी तुझ्यात रमून जातो..
मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
या मौल्यवान दिवशी तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होऊ दे,
तुझ्या यशाला सीमा न राहू दे आणि
तुझ्या आयुष्यात सुखाचा वर्षाव होऊ दे..
जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
तू म्हणजे घरात लक्ष्मीचा वास आहे
सर्व कुटुंबियांचा तू श्वास आहे
म्हणूनच आमच्या जीवनातील तुझे स्थान खास आहे..
Happy Birthday Dear Daughter..!
भरल्या घराची शोभा असते मुलगी
रित्या घराची उणीव असते मुलगी
म्हटले तर सुखाची चव असते मुलगी,
म्हटलं तर दुःखाची दवा असते मुलगी..
हॅप्पी बर्थडे डियर..!
सुख, समृद्धी, समाधान, धनसंपदा,
दीर्घायुष्य व आरोग्य लाभो तुला,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
माझ्या प्रिय परीला..!
भावाचे प्रेम, आईची माया
बापाचा तू अभिमान आहे
खरंच मुलगी म्हणजे प्रत्येक
माता पित्याचा स्वाभिमान आहे..
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
तू माझ्या पोटी जन्म घेतलास हे माझे सौभाग्य आहे,
बाळा तुझ्या वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा..
मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!
वेळ किती लवकर जातो,
कालपर्यंत माझे बोट धरून चालणारी माझी लेक
आज स्वताच्या पायावर उभी आहे.
बाळ तू तुझ्या आयुष्यात अधिकाधिक
यश प्राप्त करो हीच परमेश्वराला प्रार्थना..
Happy Birthday Dear Daughter..!
पप्पाची लाडकी परी
आमच्या घराचे घरपण
चैतन्याचं रूप..
माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!
माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
प्रत्येकाच्या आयुष्यात
एक छोटी परी यावी.
जिने त्यांच्या जीवनात
स्वप्ननगरी तयार करावी..
माझ्या परीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!
वाढदिवसाची भेट मी तुला काय द्यावी.
परमेश्वराने मला दिलेली
तू एक अनमोल भेट आहेस.
तुझ्यासोबत माझं सारं आयुष्य
मला जगता येईल यातंच मला समाधान आहे..
माझ्या मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
माझ्या जिवलग मुलीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
तू माझ्यासाठी अनमोल आहेस.
माझी प्रार्थना आहे की
तुझा वाढदिवस वैभव आणि
प्रेमाने परिपूर्ण असावा..
माझं सुख तू आहेस
माझं LIfe तू आहेस
माझा जीवनात झालेला आनंद तू आहेस
माझ्या जगण्याची आशा आणि माझा श्वास तू आहेस
तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा मुली..!
तू ते फुल नाही जे बागेत फुलते
तू तर माझ्या आयुष्यात फुललेले फुल आहेस
ज्याच्या सुगंधाने माझे जीवन आनंदित आहे..
माझ्या लाडक्या लेकीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!