Happy Birthday Atya | आत्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आज आत्या चा वाढदिवस! मित्रांनो आत्या म्हणजे वडिलांची बहीण! आत्या हि आईप्रमाणेच आपल्याला जीव लावते. आपल्याला समजून घेते, आपली काळजी घेते. अगदी स्वतःच्या मुलाप्रमाणे जपते. आत्या जरी दूर राहत असली तरी वाढदिवसाच्या दिवशी तिची आठवण आल्याशिवाय राहत नाही. तुम्ही देखील तुमच्या आत्याला वाढदिवशी खूप मिस करत असाल तर तुमच्या आत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन हैप्पी बर्थडे आत्या बोलायला विसरू नका.

आम्ही खालील पोस्टमध्ये आत्यासाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा / Birthday Wishes for Atya in Marathi सादर केल्या आहेत. त्या तुम्हाला नक्कीच आवडतील. तुमच्याकडे देखील अश्याच काही शुभेच्छा असतील तर कंमेंट मध्ये शेअर करायला विसरू नका.

Aunty is a great aunt. She is always there for us. She is always ready to help and support us in our lives. On her birthday, we should wish her a happy birthday!


Happy Birthday Wishes for Atya in Marathi

कोणी काहीही म्हणालं तरी,
आपली आत्या आपल्यासाठी जान आहे..
Love You Atya!
🎂🥳 माझ्या प्रिय आत्याला,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎂🥳


थोडीशी रागीट, थोडीशी नटखट,
आत्या आमची आहे घराची जान..
लग्न-समारंभात तिला मान..
बाबांसाठी अजूनही आहे ती लहान..
माझ्यासाठी ती लाड पुरवणारी खाण..
🎂🤩 माझ्या गोड आत्तूला वाढदिवसाच्या शुभेच्छा छान ! 🎂🤩


Birthday Wishes for Atya in Marathi

दुनियासाठी कशीपण असो,
आपल्यासाठी काळजाचा तुकडा आहे..
पावडर क्रीम नाही लावत तरीही,
माझ्या आत्याचा सुंदर असा मुखडा आहे..
Love You Atya !
आत्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

सासरी राहूनही माहेरच्या
लोकांसाठी झुरणारी..
माहेरी येण्यासाठी
सण – उत्सवांची वाट पाहणारी..
सासरच्या मंडळीत माहेरची नाते शोधणारी..
अशा माझ्या आत्याला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !


Atya Birthday Wishes in Marathi

प्रत्येकाच्या Life मध्ये एकतरी आत्या लागतेच..
जी आपले लाड करणारी,
नेहमी आपली बाजू घेणारी,
आपल्यासोबत मजा मस्ती करणारी,
आपल्यासाठी आई – बाबांना समाजवणारी,
काहीही झालं तर मला फक्त एक Phone कर असं सांगणारी,
आपल्याला नेहमी धीर देणारी आणि Support करणारी..
LOVE YOU ATYA ! 🥳🤩
आत्या तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎂🎉

आजी-आजोबांची लेक लाडकी,
आईसाठी बहिण धाकटी..
माहेरच्यांसाठी हळवी होते,
कधी लहान होऊन आमच्यात रमते..
खंबीर होऊन बाबांच्या पाठी उभी राहते,
या माझ्या आत्याचा आहे आज वाढदिवस..!
सदैव सुखी ठेव देवा तिला, हाच माझा नवस..
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा आत्या..!


Birthday Wishes for Aatya in Marathi

मी देवाला प्रार्थना करतो कि,
आपले जीवन नेहमी आनंद, समृद्धी, संपन्नता,
प्रगती, आरोग्य आणि कीर्तींनी भरलेले राहो..
आत्या तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!


प्रत्येक गोष्टीबद्दल अनुभवी,
प्रत्येक विषयाबद्दल स्पष्टपणे मत मांडणारी,
मनाने प्रेमळ, विचाराने निर्मळ,
मला आईपेक्षा जास्त जीव लावणारी,
माझे सर्व लाड पुरवणाऱ्या अश्या,
माझ्या प्रिय आत्यांना,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

लेक जन्माला येते एका घरी,
दोन घरांची तिच्या हाती दोरी..
निभावते नाते मनाने सारी,
ती असते आत्या आपली न्यारी..
माझ्या लाडक्या आत्याला,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !


वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आत्या

तू या जगातील सर्वात चांगली आत्या आहेस,
आणि माझी चांगली मैत्रीण देखील,
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

थोडी हसते, थोडी रुसते,
आत्या आमची किती छान दिसते..
लेक लाडकी आहे माहेरीची,
काळजी घेते सासरी सर्वांची..
माझ्या आत्याला,
वाढदिवसाच्या गगनभर शुभेच्छा..!


Happy Birthday Aatya in Marathi

माझ्या प्रिय,
आणि आदरणीय आत्यांना,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
मी ईश्वराकडे तुमच्या उत्तम आरोग्य,
आणि दीर्घायुष्याची प्रार्थना करतो!
Happy Birthday Dear Atya!


आत्या तिच्या भाचीसाठी एका मैत्रिणीपेक्षा कमी नसते..
ज्यांची आत्या चांगली असते, त्यांच्याशी नडायला कुणात हिम्मत नसते..!
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आत्या..!


आत्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

कधी मैत्रीण तर कधी सल्लागार असते आत्या..
मस्ती असो वा गंभीर गोष्ट, नेहमीच माझ्या बरोबर असते आत्या..
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आत्या..!

आत्या आमची लय भारी,
शॉपिंग करते खूप सारी..
नसते तिला कशाची फिकीर,
पण माहेरच्या भेटीसाठी होते अधीर..
जीव लावते सगळ्यांना, ठेवून सर्वांचा मान,
या माझ्या आत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा छान !


वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आत्या साठी

ओरडतेस, समजून घेतेस, तर कधी लाड करतेस बाबांसारखा..
शिकवतेस, समजवतेस, तर कधी प्रेम करतेस आईसारखी..
वाढदिवशी तुझ्या आज ईश्वराला प्रार्थना करतो,
सर्वांना मिळो आत्या तुझ्यासारखी..
Happy Birthday & Love You Atya!

आमची आत्या म्हणजे,
कधी नारळासारखी तर,
कधी कारल्यासारखी..
कधी प्रेमळ झरा तर,
कधी रागाचा पेटता निखारा..
तिचा असतो आम्हाला नेहमी सहारा..
अशा माझ्या बहुगुणी आत्याला,
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा !


म्हणायला तर वडिलांची बहीण असते आत्या..
परंतु प्रेम आईसारखे करते आत्या..
सर्वांची नेहमी काळजी करते आत्या..
आपल्या भाच्यांना स्वतःपेक्षा जास्त जीव लावते आत्या..!
!! हॅपी बर्थडे आत्या !!

बाबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहणारी,
आमची आत्या..
कितीही दुःख असले तरीही,
कोणाला न सांगणारी आत्या..
सासरी सर्वांची काळजी घेणारी आत्या..
तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आत्या !


आत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

नेसून पैठणी साडी,
चालवते आत्या नवी गाडी..
सगळ्यांना देते दम भारी,
आत्या माझी एक नंबरी..
माझ्या प्रेमळ आत्याला वाढदिवसाच्या
खूप साऱ्या शुभेच्छा..!

देवा, प्रत्येक घरात,
तुझ्यासारखी आत्या असू दे..
बाबांना आधार देणारी,
तुझ्यासारखी बहीण असू दे..
आईला नव्या घरात सामावून घेणारी,
तुझ्यासारखी नणंद असू दे..
माझे सगळे लाड पुरवणारी,
तुझ्यासारखी आत्या असू दे..
हीच आहे देवाकडे इच्छा..
आत्या तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !


Today is Atya’s birthday! Friends, Atya is your father’s sister! Aunty brings us to life just like mother. Understands you, takes care of you. Caring just like his own child. Even though Aunty lives far away from us, we dosent forget she on her birthday. If you also miss your aunty a lot on her birthdays, don’t forget to wish your Aunty a happy birthday by saying say Happy Birthday Aunty.

In the above post, we have presented Birthday Wishes for Atya in Marathi. hope You will definitely like that. If you have any such wishes like this, don’t forget to share them in the comments.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *