Happy Birthday Mama | मामाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Birthday Wishes for Mama in Marathi

कोणी काहीही म्हणालं तरी,
आपला मामा आपल्यासाठी जान आहे..
Love You Mama!
माझ्या प्रिय मामांना,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!


दुनियासाठी कसापण असो,
आपल्यासाठी काळजाचा तुकडा आहे..
पावडर क्रीम नाही लावत तरीही,
माझ्या मामांचा सुंदर असा मुखडा आहे..
Love You Mama!
मामा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!


मामा आणि माझ्या प्रेमाची आहे घट्ट साखळी,
मैत्री आम्हा दोघांची आहे जगावेगळी…!
Happy Birthday Mama..!


एकच इच्छा माझी,
नेहमी रहा असेच आनंदी..
तुमचा हात नेहमी राहो डोक्यावर,
हीच परमेश्वराकडे मागणी..!


प्रत्येकाच्या Life मध्ये एकतरी मामा लागतोच..
जो आपले लाड करणारा,
नेहमी आपली बाजू घेणारा,
आपल्यासोबत मजा मस्ती करणारा,
आपल्यासाठी आई – बाबांना समजवणारा,
काहीही झालं तर मला फक्त एक Phone कर असं सांगणारा,
आपल्याला नेहमी धीर देणारा आणि Support करणारा..
LOVE YOU MAMA!
मामा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!


मी देवाला प्रार्थना करतो कि,
आपले जीवन नेहमी आनंद, समृद्धी, संपन्नता,
प्रगती, आरोग्य आणि कीर्तींनी भरलेले राहो..
मामा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!


प्रत्येक गोष्टीबद्दल अनुभवी,
प्रत्येक विषयाबद्दल स्पष्टपणे मत मांडणारा,
मनाने प्रेमळ, विचाराने निर्मळ,
मला आईपेक्षा जास्त जीव लावणारा,
माझे सर्व लाड पुरवणाऱ्या अश्या,
माझ्या प्रिय मामांना,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!


माझ्या प्रिय,
आणि आदरणीय मामांना,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
मी ईश्वराकडे तुमच्या उत्तम आरोग्य,
आणि दीर्घायुष्याची प्रार्थना करतो!
Happy Birthday Mama!


तू या जगातील सर्वात चांगला मामा आहेस,
आणि माझा चांगला मित्र देखील,
मामा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!


मामा त्याच्या भाच्यासाठी एका मित्रापेक्षा कमी नसतो..
ज्याचा मामा चांगला असतो, त्याच्याशी नडायला कुणात दम नसतो..!
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा मामा..!


कधी मित्र तर कधी सल्लागार असतो मामा..
मस्ती असो वा गंभीर गोष्ट, नेहमीच माझ्या बरोबर असतो मामा..
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा मामा..!


शिकवतोस, समजवतोस, तर कधी ओरडतोस वडिलांसारखा..
प्रेम करतोस, समजून घेतोस, तर कधी लाड करतोस आईसारखा..
वाढदिवशी तुझ्या आज ईश्वराला प्रार्थना करतो,
सर्वांना मिळो मामा तुझ्यासारखा..
Happy Birthday & Love You Mama!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *