Happy Birthday Kaka | काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

आज काकांचा वाढदिवस! मित्रांनो काका म्हणजे वडिलांचे भाऊ! काका ही आपल्याला बाबांप्रमाणेच जीव लावतात. आपल्याला समजून घेतात, आपली काळजी करतात. अगदी स्वतःच्या मुलाप्रमाणे जपतात. काका जरी दूर राहत असले तरी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. तुम्ही देखील तुमच्या काकांना वाढदिवसाला खूप मिस करत असाल तर तुमच्या काकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन ( हैप्पी बर्थडे काका / Happy Birthday Kaka ) बोलायला विसरू नका.

आम्ही खालील पोस्टमध्ये काकासाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा / Birthday Wishes for Kaka in Marathi सादर केल्या आहेत. त्या तुम्हाला नक्कीच आवडतील अशी आशा आहे. तुमच्याकडे देखील अश्याच काही शुभेच्छा असतील तर कंमेंट मध्ये शेअर करायला विसरू नका.

Uncle is a great Father. He is always there for us. He is always ready to help and support us in our lives. On his birthday, we should wish him a Happy Birthday!


Happy Birthday Wishes for Kaka in Marathi

कोणी काहीही म्हणालं तरी,
आपले काका आपली जान आहे..
Love You Kaka!
🎂🥳 माझ्या प्रिय काकांना,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎂🥳

थोडेसे रागीट, थोडेसे कडक,
काका आमचे आहेत घराची जान..
लग्न-समारंभात त्यांचा पहिला मान..
बाबांसाठी अजूनही आहेत ते लहान..
माझ्यासाठी ते लाड पुरवणारी खाण..
🎂🤩 माझ्या गोड काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा छान ! 🎂🤩


Birthday Wishes for Kaka in Marathi

दुनियासाठी कसेपण असो,
आपल्यासाठी काळजाचा तुकडा आहे..
पावडर क्रीम नाही लावत तरीही,
माझ्या काकांचा सुंदर असा मुखडा आहे..
Love You Kaka !
काका तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!


Kaka Birthday Wishes in Marathi

प्रत्येकाच्या Life मध्ये एकतरी काका लागतोच..
जो आपले नेहमी लाड करणारा,
नेहमी आपली बाजू घेणारा,
आपल्याला समजून घेणारा,
आपल्यासाठी आई – बाबांना समजवणारा,
काहीही झालं तर मला फक्त एक Phone कर असं सांगणारा,
आपल्याला नेहमी धीर देणारा आणि Support करणारा..
LOVE YOU KAKA! 🥳🤩
काका तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎂🎉


Birthday Wishes for Kaka in Marathi

मी देवाला प्रार्थना करतो कि,
आपले जीवन नेहमी आनंद, समृद्धी, संपन्नता,
प्रगती, आरोग्य आणि कीर्तींनी भरलेले राहो..
काका तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!

 


प्रत्येक गोष्टीबद्दल अनुभवी,
प्रत्येक विषयाबद्दल स्पष्टपणे मत मांडणारे,
मनाने प्रेमळ, विचाराने निर्मळ,
मला बाबांपेक्षा जास्त जीव लावणारे,
माझे सर्व लाड पुरवणाऱ्या अश्या,
माझ्या प्रिय काकांना,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!


वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काका

तू या जगातील सर्वात चांगला काका आहेस,
आणि माझा चांगला मित्र देखील,
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!


Happy Birthday Kaka in Marathi

माझ्या प्रिय,
आणि आदरणीय काकांना,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
मी ईश्वराकडे तुमच्या उत्तम आरोग्य,
आणि दीर्घायुष्याची प्रार्थना करतो!
Happy Birthday Dear Kaka!

 


काका त्याच्या भाच्यासाठी एका मित्रापेक्षा कमी नसतो..
ज्याचा काका चांगला असतो, त्याच्याशी नडायला कुणात दम नसतो..!
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा काका..!


काकाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

कधी मित्र तर कधी सल्लागार असतो काका..
मस्ती असो वा गंभीर गोष्ट, नेहमीच माझ्या बरोबर असतो काका..
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा काका..!


वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काका साठी

शिकवतोस, समजवतोस, तर कधी ओरडतोस बाबांसारखा..
प्रेम करतोस, समजून घेतोस, तर कधी लाड करतोस आईसारखा..
वाढदिवशी तुझ्या आज ईश्वराला प्रार्थना करतो,
सर्वांना मिळो काका तुझ्यासारखा..
Happy Birthday & Love You Kaka!

आमचे काका म्हणजे,
कधी गुळा सारखे तर,
कधी कारल्यासारखे..
कधी प्रेमळ झरा तर,
कधी रागाचा पेटता निखारा..
त्यांचा असतो आम्हाला नेहमीच सहारा..
अशा आमच्या बहुगुणी काकांना,
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा !


म्हणायला तर वडिलांचे भाऊ असतात काका..
परंतु प्रेम बाबांसारखे करतात काका..
सर्वांची नेहमी काळजी करतात काका..
आपल्या पुतण्यांना स्वतःपेक्षा जास्त जीव लावतात काका..!
!! हॅपी बर्थडे काका !!


काकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

काळा कोट, फ़्रेंच दाढी,
चालवतात काका नवी गाडी..
सगळ्यांना देतात दम भारी,
काका माझे एक नंबरी..
माझ्या प्रेमळ काकांना वाढदिवसाच्या
खूप साऱ्या शुभेच्छा..!

देवा, प्रत्येक घरात,
तुमच्यासारखा काका असू दे..
बाबांना आधार देणारा,
तुमच्यासारखा भाऊ असू दे..
माझे सगळे लाड पुरवणारा,
तुमच्यासारखा काका असू दे..
हीच आहे देवाकडे इच्छा..
काका तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !


काका आजच्या या जन्मदिवशी,
आपणास दीर्घायुष्याची प्राप्ती होवो हीच प्रार्थना..
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!
Happy Birthday Kaka..

 

काका, तुमच्यापासून कितीही दूर राहिलो,
तरी, तुम्ही दिलेले संस्कार कधी विसरणार नाही..
तुमच्या वरील प्रेम कधी कमी होणार नाही..
देवाकडे आहे एकच मागणं,
सुखी ठेव माझ्या काकांना,
जो पर्यंत आहेत सूर्य तारे..
आम्हां सर्वांना मिळो,
प्रेम त्यांचे सारे..
वाढदिवसाच्या अनंत अनंत शुभेच्छा काका !

 

आमचे काका म्हणजे, प्रेमाचा निर्मळ झरा,
शांत, संयमी स्वभावाचे किमयागार,
आम्हां भावंडांसाठी अलादिनचा चिराग,
बाबांकडे मागण्या पूर्ण करून घेण्याचं
हक्काचं ठिकाण..
अशा आमच्या प्रेमळ काकांना,
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!

 

आमच्या शुभेच्छानी तुमच्या वाढदिवसाचा
हा क्षण एक सण होवो हीच सदिच्छा..
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!
काका तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

 

वटवृक्षा सारखी माया लावणारे,
आकाशाच्या उंची इतके प्रेम देणारे,
प्रत्येकाशी प्रेमाने वागणारे,
घरातील एकमेव व्यक्ती म्हणजे आमचे काका..
कुटुंबातील प्रत्येकाशी जिव्हाळयाचे नाते ठेवणाऱ्या,
आमच्या लाडक्या काकास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

आजोंबांची छाप, वडिलांचा धाक,
आत्याचं प्रेम, आजीची माया,
एकाच व्यक्तीमध्ये दिसते..
ती व्यक्ती असते आपले काका..
माझ्या प्रेमळ काकाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !

स्वार्थी जगात दुनियादारी ज्यांनी शिकवली,
कोण आपले आणि कोण परके,
याची जाणीव ज्यांनी करून दिली..
आपल्या लेकरांसोबत आम्हांलाही,
तितकीच माया लावली..
अशा माझ्या लाडक्या काकांना
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !

 

शाबासकीची थाप ज्यांची आधी पडते,
कौतुकाचा वर्षाव ज्यांच्याकडून होतो,
काही चुकल्यास कान उघाडणीही होते,
बाबांच्या मारा पासून जे नेहमी वाचवतात,
येता जाता हातावर खाऊसाठी पैसे देतात,
या माझ्या जिवलग काकांना,
वाढदिवसाच्या लाख मोलाच्या शुभेच्छा !

 

फेसबुक इन्स्टा वापरणारे,
रोजच्या रोज Status बदलणारे,
इंटनेटचा पुरेपूर वापर करणारे,
तरुणांना हि लाजवेल अशी
पर्सनॅलिटी असणारे..
आमच्यासाठी जीवाला जीव देणारे,
घरच्यांसाठी काहीही करणारे,
आमच्या लाडक्या काकास,
वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा !

 

आयुष्याची गणिते कशी सोडवायची,
हे ज्यांनी शिकवले, आज त्यांचा म्हणजे,
आमच्या लाडक्या काकांचा वाढदिवस !
येणारा प्रत्येक दिवस तुमच्या प्रगतीचा आणि
निरामय आरोग्याच्या ठरावा,
हीच देवाकडे प्रार्थना..
वाढदिवसाच्या अनंत अनंत शुभेच्छा..!

मैत्रीच्या दुनियेत आहे पहिला नंबर..
वाढदिवासाला केक कापतात शंभर..
घराच्या सुखासाठी नेहमीच असतात तत्पर..
अशा माझ्या काकाला वाढदिवसाच्या,
शुभेच्छा देतो आभाळभर..
हॅपी बर्थडे काका..!

काका म्हणजे अक्ख्या घराची जान,
घरातील समारंभासाठी काकाला मान..
मित्रांच्या मैफिलीत काकांची शान..
अशा माझ्या काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा छान !

घरातील घरपण टिकवून ठेवण्यासाठी,
बापा बरोबर राबणारे आमचे काका..
सरळ साधी राहणी त्यांची, अंदाज आहे निराळा..
माझ्या एका हाकेला धावून येणाऱ्या,
माझ्या काकाला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा !

 

बाबा आपल्या पाठीशी उभे असतांना,
बाबांच्या पाठीशी उभे राहून आधार देणारे..
असाच आधार कायम राहील हिच आशा,
हेच प्रेम सतत राहील हीच आकांक्षा..
काका तुम्हाला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा…!!!

 

जसे प्रेम आम्हाला देत आलात,
ते सर्व प्रेम तुम्हाला मिळो..
प्रत्येक संकटात तुमची आम्हाला साथ लाभो,
प्रत्येक क्षणी प्रेमाची एक थाप नेहमी राहो..
या वाढदिवशी तुमची सर्व स्वप्न साकार होवो..!
बाबांसारखी माया लावणाऱ्या,
लाडक्या काकांना वाढदिवसाच्या मनःपुर्वक शुभेच्छा..!

 

बाबा पेक्षा वेगळे नसणाऱ्या,
प्रत्येक संकटात पाठीशी खंबीर उभे राहणाऱ्या,
बाबांच्या प्रेमात भर टाकणाऱ्या काकांना..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

 

प्रत्येक गोष्टीबद्दल अनुभवी,
प्रत्येक विषयाबद्दल स्पष्टपणे मत मांडणारे,
मनाने प्रेमळ, विचारांनी निर्मळ,
मला बाबांपेक्षा जास्त जीव लावणारे,
माझे सर्व लाड पुरवणाऱ्या अश्या,
माझ्या प्रिय काकांना,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

 

प्रत्येकाच्या आयुष्यात काका असावेच,
प्रत्येक हाकेला धाऊन येण्यासाठी..
नाती जपायला आणि धीर देण्यासाठी..
चुकत असेल तर समजावण्यासाठी..
आणि,
कुटुंबाला जोडून ठेवण्यासाठी…
काका तुम्हाला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा..!

 

कधी मित्र तर कधी मुलगा म्हणून,
मज लावतात प्रेमाचा लळा..
आजच्या या शुभप्रसंगी आपणास,
वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो हजार वेळा..!
हॅपी बर्थडे काका..!


Today is your uncle’s birthday! Friends, uncle is father’s brother! Uncle loves us like our Father. Understands you, take care of you. Caring just like their own child. Even though our uncle lives far away, we do not forget him on his birthday. If you miss your uncle’s on his birthday too, don’t forget to wish your uncle a happy birthday by saying Happy Birthday Kaka.

We have presented Birthday Wishes for Kaka in Marathi in the above post. We hope you enjoy the collection. If you have any such wishes, don’t forget to share them in the comments.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *